१ फेबृवारीपासून सर्वसामांन्यांना ठराविक वेळेत लोकलमधून प्रवास करता येणार असल्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला. यावर मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी नाराजी व्यक्त करीत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. खुशखबर… करोनाबरोबर सरकारचा ऐतिहासिक करार… ठरावीक वेळेतच लोकलमधून फिरण्याचे करोनाचे आश्वासन… जगभरातल्या डॉक्टरांना जमले नाही ते कम्पाउंडरने करून दाखवले… अभिनंदन!’ असे ट्वीट करत त्यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेक दिवस मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल बंद होती. त्यानंतर कोरोनायोद्धे आणि काही ठराविक सवेतील कर्मचारी यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली होती. कोरोनाचा प्रसार कमी होतांना दिसत असतानांच सामान्यांसाठीसुद्धा लोकलने प्रवास करण्याची बंदी काढून प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशा विनंत्या वारंवार सरकारला करण्यात आल्या. राज्य सरकारने त्यावर विचार करत अलिकडेच एक निर्णय घेतला ज्यामध्ये ठराविक वेळेत सामान्यांना लोकलनी प्रवास करण्याची मुभा असणार आहे. मात्र शासनाच्या या निर्णयवार काही मुंबईकर नाराजी व्यकत करतांना दिसत आहे. ठराविक वेळेच्या बंधनामुळे या परवानगीचा सामान्य माणसाला काहीही ऊपयोग होणार नाही असे काही प्रवाशांचे मत आहे.
याच पार्श्वभूमिवर संदिप पाठक यांनी सरकारवर टीका केली आहे. कोरोनासोबत सरकारचा ऐतिहासिक करार झाला असून आता कोरोनाने सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली आहे असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
राज्य सरकारने लवकरांत लवकर सामान्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी या भूमिकेबद्दल संदिप देशपांडे याअगोदरसुद्धा आग्रही होती. याकरिता सर्व नियमांना झूगारुन त्यांनी लोकलने प्रवास करीत मनसे स्टाईलने आंदोलनसुद्धा केले होते. दरम्यान त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबईची लाइफलाइन १५ डिसेंबर आणि त्यानंतर १ जानेवारीपासून पूर्ववत सुरू करण्याबाबत राज्य सरकारने पावले उचलली होती. मात्र दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यांत करोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुंबई महापालिकेने करोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेतली. त्यामुळे लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला. नव्या वर्षातील करोनाच्या रुग्णसंख्येवर नजर ठेवायची आणि त्यानंतरच लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारला कळवले जाईल, अशी भूमिका मुंबई महापालिकेने घेतली होती. त्यामुळे जानेवारी महिना उलटेपर्यंत लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता, मात्र आता फेब्रूवारीपासून लोकल सुरू करण्यचा निर्णय घेण्यात आला आहे.