यावर्षिच्या शिवजयंतीवर कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने काही मार्गदर्शक नियमावली जाहीर केली होती. यामध्ये कही जटील नियमांचा समावेश होता. त्यावरुन भाजपने महाविकासआघाडी सरकारवर प्रचंड टीका केली. मात्र आता मनसेनेसुद्धा यामध्ये उडी घेतली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याप्रकरणी ट्वीट करत सरकारच्या या नियमांवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कडक शब्दांत टीकासुद्धा केली आहे.
“छ. शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात साजरी नाही करायची तर मग टीपू सुल्तानची करायची का?” असा सवाल बाळा नांदगावकरांनी केला आहे. “आपण आज जे काही आहोत ते छ. शिवाजी महाराजांमुळे आहोत, मग त्यांच्याच जयंतीवर बंधने टाकतायत. अजान स्पर्धा, बार ऊघडण्याचा निर्णय, निवडणुकांत कोरोनाच्या नियमांची झालेली पायमल्ली चालते आणि शिवजयंतीलाच नियमावली” असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकावर निशाना साधला आहे.
कोरोनाचा वेग आता अोसरत आहे. अनेक शिवजयंती साजरे करणार्या मंडळांनी याअगोदरच शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचे ठरवले होते. त्यामुळे कार्यक्रमांचे नियोजन त्यांनी पुर्वीच केलेले आहे. मात्र राज्य सरकारच्या या वेळेवर जाहीर केलेल्या नियमावलीमुळे आता या मंडळांच्या शिवजयंती ऊत्सवावर पाणी फीरणार आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्येसुद्धा नाराजीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे मराठी माणूस या मुद्द्याबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्दयास प्राधान्य देते आहे. बाळा नांदगावकर यांच्या टीकेवरुन हे अधिकच स्पष्ट होते.