मनसेच्या वाघाने पुण्यात स्वतःच्या जीवावर हॉटेलात सुरू केलं कोरोना हॉस्पिटल

50


पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या प्रयत्नातून कात्रज परिसरात एका हॉटेलच्या हॉलमध्ये ४० ऑक्सिजन आणि ४० आयसोलेश बेड्सचे कोविड हॉस्पिटल साकारले असून याचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने हे कोविड हॉस्पिटल साकार करण्यात आले आहे. ४० ऑक्सिजन बेड्समुळे मोठी मदत कोरोना रुग्णांसाठी या भागात होणार आहे.
त्यामुळे मनसे पुन्हा एकदा नागरिकांच्या मदतीला धाऊन आल्याची जाणीव नागरिकांमध्ये आहे.