मनसेच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

11

शिवसेनेची ताकद कल्याण डोंबिवलीत आहेच ती आता अधिक वाढते आहे. महाराष्ट्रातही ही ताकद वाढत आहे. शिवसेनेच्या भगव्या खाली एकत्र येत आहेत. या सर्वांच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वाव सर्व तरुणांना दिला जात आहे.

एकीकडे अर्थसंकल्पाची धामधूम सुरु असताना, इकडे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेना प्रवेशाची रेलचल पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या डोंबिवलीतील बड्या कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधलं.

देशाचा अर्थसंकल्प आहे, निवडणुकीचा नाही. बजेटवर मी पूर्ण बोलेन, अधिक माहिती घेऊन मत मांडेन असंही मुख्यमंत्री आजच्या आर्थिक बजेटच्या सादरीकरनावरून म्हणले आहेत.

शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेचे कल्याण तालुक्यातील माजी अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

अर्जुन पाटील यांच्यासह डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी सेना पदाधिकारी सागर जेधे यांनीही प्रवेश केला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे शिवसेनेत आले आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत केलं आहे.