कल्याण पूर्व मध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट

22

बेसावध लोकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोऱ्यांसोबतच आता बेसावध लोकांच्या हातातून महागड्या मोबाईल हिसकावून घेण्याचे प्रमाण कल्याण स्टेशन पूर्व परिसर, सहजानंद चौक, लाल चौकि, आधारवाडी, रमाईनगर इत्यादी परिसरात झपाट्याने वाढले आहेत.

कल्याण स्टेशन वरून वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाश्यांना याचा खूप त्रास होतोय. महागड्या मोबाईल असलेल्या प्रवास्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून, ते रिक्षात वगैरे बसल्यानंतर त्यांच्याकडील दुचाकीवर त्यांचा पाठलाग करणे व जसं संधी मिलेळ तसं मोबाईलफोन हातातून हिसकावून घेऊन गल्लीबोळाने पळून जाने, रस्त्यावर बेसावध थांबलेल्या प्रवास्यांच्या हातातून जसं संधी मिळेल तसं मोबाईल हिसकावून घेणे याचे प्रमाण खूप वाढले आहेत.

५ एप्रिलला अश्याच दोन सराईत चोरट्यांनी त्यांच्या स्कूटीवरून सहजानंद चौक पासून आधारवाडी पर्यंत एक इसम बसलेल्या ऑटो रिक्षाचा पाठलाग करत आधारवाडीमध्ये इसम बेसावध असताना त्याच्या हातून त्याचा मोबाईल हिसकावून गल्लीबोळातून पळून गेले. त्या इसमांनी त्याच दिवशी रात्री बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याण पूर्व येथे तक्रार दिली आहे, सोबतच आयएमइआय क्रमांक देवू केले आहे. पोलिसांनी तक्रार घेवून सहकार्य केले आहे, आम्ही तुमचा मोबाईल ट्रेसिंग वर टाकत आहोत जसेही तुमच्या मोबाईल बद्दल काही माहिती मिळेल आम्ही तुम्हाला ती कळवतो असे बोलले आहे.

कल्याण पूर्व परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आश्चर्य या बीबीचं वाटत आहे कि चोरट्यांची इतकी कशी हिम्मत वाढते..? जे कि चालत्या गाडीतून हातातील मोबाईल हिसकावून घेतात व पळून जातात त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे कधी कोण कुठून येईल व आपली कोणती वस्तू हातातून हिसकावून घेईल याचा नेम नाही. त्यामुळे या सर्व बाबींवर लवकरच अंकुश आणायला पाहिजे. ठाणे शाहर पोलिस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या कल्याण मधील सर्व पोलिसांनी अश्या सराईत गुन्हे गारांच्या वेळीच मुसक्या आवळल्या पाहिजे नाहीतर हे चोर काहीही करायला मागे पुढे पाहणार नाहीत. छोट्या-मोठ्या वस्तूसाठी सामान्य नागरिकांसोबत हातापाईहि करतील वेळप्रसंगी खूनही करायला त्यांचे हातपाय धजावणार नाहीत.

प्रवाश्यांनीही आता थोडे सावध राहिले पाहिजे मोबाईलफोनचा वापर गर्दीच्या ठिकाणी, रिक्षा वगैरे मध्ये कडेला बसले असताना सावधपणे केला पाहिजे आणि असे काही अनुचीत प्रकार घडल्यास नजीकच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली पाहिजे व पोलिसांनी त्यावर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे तरच अश्या गुन्हेगारांवर अंकुश लागेल अन्यथा ते फोफावतील व सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील करून सोडतील.