मॉडेल पूनम पांडेने केले शिल्पा शेट्टीच्या पतीवर गंभीर आरोप

6

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे ही नेहमीच बोल्डनेस मुळे चर्चेत असते. आता तिने प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती बिझनेसमन राज कुंद्रा यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. राज कुंद्रा याने आपले फोटो चोरले असल्याचा आरोप पूनमने लावला आहे. तिने राज कुंद्रा आणि त्यांचा सहकारी सौरभ कुशवाहच्या विरोधात मुंबई हायकोर्टात तक्रार दाखल केली आहे.

पूनम पांडेने आरोप केला आहे की, राज कुंद्रा व त्यांच्या कंपनीने गैर कायदेशीर प्रकारे तिचे व्हिडीओ आणि फोटोंचा वापर केला आहे. या कंटेंटचा वापर दोघांमधील कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर करण्यात आला असे तिने सांगितले आहे. तसेच तिचा कंटेंट वापरून राज कुंद्रा पैसे कमावत आहे. मागील सहा महिन्यांपासून काही लोक तिला कॉल करून अश्लील बोलत आहेत. आर्म्सप्राइम कंपनी माझे अँप सांभाळत होती. मी कॉन्ट्रॅक्ट कमी वेळासाठी ठेवले कारण त्यात फसवणुकीसारखे वाटत होते. काही कालावधी नंतर मी कॉन्ट्रॅक्ट संपवले तरिही 8 महिन्यांपासून ते माझे व्हिडीओ चोरत आहेत. मी राजला कॉल आणि मॅसेज करून हे करण्यास मनाई देखील केली होती असे तिने स्पष्ट केले.

मात्र राज कुंद्रा आणि सौरभ कुशवाह यांनी पूनमचे आरोप फेटाळून लावले आहेत. राज कुंद्राने कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही असे स्पष्ट केले आणि कंपनीने काहीच केले नसल्याचे देखील सांगितले आहे. पूनम पांडेने 2 महिन्यांपूर्वी लग्न केले आहे. तिने सप्टेंबर महिन्यात तिचा बॉयफ्रेंड असणाऱ्या सॅम बॉम्बेशी विवाह केला आहे. मात्र काहीच दिवसांत पूनमने नवऱ्याच्या विरोधात केस दाखल केली. त्यांनतर तिने आपली तक्रार मागे घेतली होती. सध्या ती गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत.