अन ‘हा’ पुरस्कार प्राप्त झालेले मोदी ठरले भारताचे पहिले राष्ट्रप्रमुख

11

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनातर्फे लेजिऑन ऑफ मेरीट हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे. तो मोदींच्यावतीने भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीतसिंग संधु यांनी स्वीकारला.व्हाईट हाऊसमध्ये हा कार्यक्रम झाला.

मोदींबरोबरच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन आणि माजी जपानी पंतप्रधान शिंजो अबे यांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे.भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी नवीन उंचीवर नेण्याच्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रियन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमेरिकेतील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो आणि हा पुरस्कार प्राप्त झालेले मोदी हे भारताचे पहिले राष्ट्रप्रमुख ठरले आहेत.