मागच्या दीड महिन्यापासून दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात समर्थन मिळत आहे.
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितित भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजप 400 चा आकडा क्रॉस करणार. काँग्रेसला मात्र एका बसमध्ये बसवून नेता येईल येवढेच खासदार मिळणार, असा दावा करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी