मोदींनी राज्य आणि स्थानिक सरकारांना स्वतःची लस खरेदी करण्यास भाग पाडले : पृथ्वीराज चव्हाण

15

पंतप्रधान नरेंद्र माेदींचे सरकार हे जगातील एकमेव सरकार आहे ज्यांनी राज्य आणि स्थानिक सरकारांना स्वतःची लस खरेदी करण्यास भाग पाडल अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी माेदींवर केली आहे.

 तसेच भारताचे लस खरेदी धोरण पाेकळ ठरले आहे. केंद्र सरकारने जबाबदारी झटकत राज्य आणि स्थानिक सरकारला लस खरेदी करण्यास भाग पाडले आहे असे टि्वट काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

असे जरी असले तरी लस उत्पादकांनी उप-राष्ट्रीय सरकारला विक्री करण्यास नकार दिला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार विवाद उद्भवल्यास, हा फक्त एक सार्वभौम सरकार (केंद्र सरकार) जे वर्ल्ड ट्रेड सेंटरचा सदस्य आहे याच्याशी सोडविला जाऊ शकतो असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.