चक्क दीड कोटींचा ‘मोदी बकरा’ आटपाडीच्या बाजारात विक्रीसाठी

2

गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाउनमुळे सर्व काही बंद होते. अनेक व्यवहार ठप्प होते त्याचप्रमाणे जनावरांचे बाजार देखील पूर्णपणे बंद होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी मधील जनावरांचा बाजार खूप प्रसिद्ध आहे. आटपाडीमधील प्रसिद्ध दैवत उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनंतर आयोजित जनावरांच्या बाजाराला यावर्षी मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये आटपाडी पौर्णिमेची यात्रा प्रसिद्ध आहे.

दरम्यान, या जनावरांच्या बाजारात सांगोल्याचे शेतकरी बाबुराव मेटकरी यांच्या मोदी बकऱ्याला 70 लाखांची मागणी झाली. त्यांनी या बरक्याची विक्री किंमत दिड कोटी सांगितली होती. या पूर्ण बाजारात मेटकरी यांचा बकरा खूप आकर्षक ठरला. त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी देखील केली होती. या ‘मोदी’ चे लहान पिल्लू असलेल्या सोमनाथ जाधव यांच्या दोन महिन्यांच्या मेंढीला 14 लाखांची मागणी केली होती. मोदी बकऱ्याला 70 लाखांची मागणी झाली होती परंतु मेटकरी यांनी दिड कोटी शिवाय बकरा देणार नाही असा निर्णय घेतल्यामुळे ‘मोदि बकरा’ विकू शकला नाही.

या बाजारामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, विजापूर या भागांमधील मेंढपाळ बकऱ्या आणि मेंढ्या विक्रीसाठी घेऊन आले होते. त्यामुळे खरेदीसाठी देखील खूप मेंढपाळ येथे जमा झाले होते. मेटकरी यांना बकऱ्याचे नाव ठेवण्यामागील कारण विचारल्यानंतर त्यांनी सांगीतले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगले काम करून जगभर नाव मिळवले आहे ते आमचे आदर्श आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या बकऱ्याला त्यांचे नाव दिले. हा बकरा आमचा जीव की प्राण आहे. असे मेटकरिंनी सांगितले. अनेकजण याला विकण्यास सांगतात पण आम्ही हा विकणार नाही. असे बकरे कापण्यासाठी नाही तर प्रजाती वाढवण्यासाठी उपयोगात आणले जातात, असे जाणकारांनी सांगितले.