राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत, केंद्रीय कृषी कायद्याविरोधातील लढाईत काँग्रेस शेतकऱ्यांसोबत आहेकेंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमधील आणखी एक चर्चेची फेरी निष्फळ ठरली. शेतकऱ्यांनी शेतकरी कायदा रद्द करण्याशिवाय कोणतीही मागणी करावी, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले
दरम्यान,मित्रांच्या कर्जमाफीनंतर आता शेतकऱ्यांच्या पैशांवर मोदी सरकारचा डोळा आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.जोपर्यंत नवीन कृषी कायदे रद्द केले जात नाहीत, तोपर्यंत काँग्रेस मागे हटणार नाही, असे आश्वासन राहुल गांधींकडून देण्यात आले होते.
आंदोलक शेतकरी केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर, केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांची १९ जानेवारीला चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांची बाजू घेत केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत