मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगेखोर : ममता बॅनर्जी

47

हुगली जिल्ह्यातील साहागंज येथे आयोजित सभेत ममता यांनी मोदींवर हल्लाबोल केला. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे खोटेपणा आणि विद्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तृणमूल पक्षात महिलांना सन्मान दिला जातो. आईप्रमाणे वागणूक दिली जाते. आपल्या राज्यात शांतता आहे, कारण आपली पश्‍चिम बंगालची भूमि ही माता-भगिनींची आहे. गुजरात बंगालवर नियंत्रण मिळवू शकत नाही, असे त्या म्हणाल्या. 

तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीच्या सीबीआय चौकशीचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, ही चौकशी महिलांचा अपमान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगेखोर असून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही त्यांची स्थिती वाईट होईल, अशी टीका आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.

हिंसेने काहीच साध्य होत नाही. नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे दंगलखोर आहेत. ट्रम्प यांचे काय झाले. त्यांचे (मोदीं) यापेक्षाही अधिक हाल होतील.अस ही त्या बोलताना म्हणाल्या.