हिटलरला माघे टाकण्याचे काम मोदी करत आहेत: रघुनाथदादा पाटील

18

शेतकरी संघटना आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी ( ता. 6) विविध संघटनांकडून पाठिंबा दिला जातो आहे.पाकिस्तान बॉर्डरवर सुद्धा अशी परिस्थिती नाही. अशी परिस्थिती मोदी सरकारने दिल्लीमध्ये केली आहे. हिटलरला माघे टाकण्याचे काम मोदी करत आहेत, अशी टीका शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

चार दिवसापूर्वी मोदी सरकारने आम्ही केवळ एका फोन कॉलच्या अंतरावर आहोत, अशी घोषणा केली. प्रत्यक्षात शेतकरी आंदोलकांनी दिल्लीत येवू नये यासाठी रस्त्यावर खिळे, अडथळे, मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पाकिस्तानच्या सीमेवरही एवढा बंदोबस्त नाही.

पाटील म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीतील आंदोलनला पाठिंबा देत आहेत आणि महाराष्ट्र मध्ये ऊस कारखानदार, बाजार समित्यांतील गैरकारभारांला पाठिंबा घालत आहेत. ही गंभीर बाब आहे. महाराष्ट्रातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. ऊसाला दर मिळत नाही. ऊस गाळपानंतर 14 दिवसात बिल देण्याचा नियमही पाळला जात नाही.

दिल्लीत आंदोलक शेतकरी मयत झाले. सरकारला लाज वाटायला हवी होती. माणुसकीची भान आज मोदी सरकारला नाही. हिटलरला माघे टाकण्याचे काम मोदी करत आहेत.

प्रत्यक्षात शेतकरी आंदोलकांनी दिल्लीत येवू नये यासाठी रस्त्यावर खिळे, अडथळे, मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पाकिस्तानच्या सीमेवरही एवढा बंदोबस्त नाही. चीनच्या सीमेवर एवढा बंदोबस्त ठेवला असता तर त्यांनी चार किलोमिटर आत येवून गाव वसवले नसते.’ अशी टीकाही केली.