पश्चिम बंगालच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. पीएम किसान योजनेची रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर रुपये 18 हजार देण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारात आश्वासन दिलं होतं. ते त्यांनी पूर्ण करावं असं ममता यांनी पत्रात म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रावरुन पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना पीए किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे
प्रचारासाठी तुम्ही पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी तुम्ही शेतकऱ्यांना 18 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. याची आठवण ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांना करून दिली.
मात्र, अद्यापपर्यंत पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारला कोणताही निधी मिळालेला नाही. शेतकऱ्यांचा निधी राज्य सरकारकडे वर्ग करा, अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी पत्राद्वारे मोदी यांच्याकडे केली आहे.