नोटबंदी ही पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक रचलेला कट; राष्ट्रीय शोकांतिकेला चार वर्ष झाल्याने आवाज बुलंद करा : राहुल गांधी

4

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारवर टीका केली आहे. नोटबंदीला चार वर्ष पूर्ण झाल्यामुळे काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकार विरोधात आंदोलनाला सुरुवात केल्याचं दिसतय. राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की, ’नोटबंदी ही पंतप्रधानांनी एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता. तसेच राष्ट्रीय शोकांतिकेला चार वर्ष झाल्याच्या निमित्ताने तुम्हीही आवाज बुलंद करा, असं आवाहन या व्हिडीओमधून त्यांनी देशातील नागरिकांना केलं आहे.

‘आज भारतासमोर एक मोठा प्रश्न उभा आहे. कोरोना संकट आलं आहे. अशातच प्रश्न हा आहे की, ‘बांग्लादेशाची अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा पुढे कशी? एकवेळ अशी होती की, भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत उत्तम होती. यावर सरकारकडून कोरोनाचं कारण देण्यात येत आहे. अस राहुल गांधीनी म्हटलं आहे. पण, कोरोना तर बांग्लादेशातही आहे. संपूर्ण जगभरात आहे. कारण कोरोनाचं असेल तर भारत सर्वात मागे कसा राहिला?’ भारताची अर्थव्यवस्था मागे राहण्यात कारण कोरोना नाही, कारण नोटबंदी, जीएसटी आहे.’ असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.