विश्वातील सर्वात मोठे स्टेडीयम म्हणून नावरुपास आलेल्या मॉटेरा स्टेडीयमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. यापुढे अहमदाबादमधील या स्टेडीयमला नरेंद्र मोदी स्टेडीयम म्हणून अोळखले जाणार आहे. मात्र यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडण्यास सुरुवात केली. त्याठिकाणी अगोदर सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव होते. त्यामुळे हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान असल्याचे कॉंग्रेसचे नेते म्हणत आहेत. दरम्यान महाराष्ट्रातूनसुद्धा यावर तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्या.
महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री तसेच राष्ट्रवादी कॉंग्तेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या नामकरण प्रकरणावरुन मोदींवर कडाडून टीका केली आहे. जर्मनीचा कृर हुकुमशहा अशी अोळख असणार्या हीटलरनेसुद्धा सत्तेवर आल्यानंतर स्वत:चे नाव एका स्टेडीयमला दिले होते. असे ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी थेट हीटलरशी पंतप्रधान मोदींची तुलना केली आहे.
कॉंग्रेसकडून सातत्याने यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहे. अशांतच गुजरात कॉंग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांनीसुद्धा या नामकरणावर टीका केली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निर्बंध आणले होते. त्यामुळेच संघाचे लोकं पटेलांचं नाव मिटवण्याच्या प्रयत्नांत आहे. असे ट्वीट हार्दिक पटेल यांनी केले. तर मरणोत्तर आपले नाव कुणी विसरु नये या भावनेतून पंतप्रधानांनी हे नामकरण केले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठे असे स्टेडीयम निर्माण करण्यात आले आहे. मंगळवार (दि. २३ फेबृ.) या स्टेडीयमवर भारत विरुद्ध ईंग्लण्ड कसोटी सामन्यास सुरुवात झाली. याअगोदर या स्टेडीयमचे ऊद्घाटन करुन यांस नरेंद्र मोदी स्टेडीयम असे नाव देण्यात आले.