महाराष्ट्रातही तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातही वादळ मोठ्याप्रमाणावर आले. महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरात भागाचा हवाई दौरा करणार आहेत. या हवाई दौऱ्यात ते गुजरात आणि दीव- दमण भागाचा दौरा करून नुकसानीची पाहणी करतील.
यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदींना थेट सवाल केला आहे. महाराष्ट्रातही तौक्ते वादळाने नुकसान झाले आहे, मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत? असा सवाल नवाब मलिक यांनी ट्वीट करत उपस्थित केला आहे.