…’तर’ वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पराभव होईल; भारताच्या माजी क्रिकेटपटूचे भाकित

11

भारतीय क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाने एकदिवसीय मालिका गमावली. त्यानंतर 2-1 च्या फरकाने टी 20 मालिका जिंकण्यात टीम इंडियाला यश आलं. 2021 मध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन भारतात होणार आहे. ही वर्ल्ड कप स्पर्धा भारतात असूनही टीम इंडियाचा पराभव होईल, असं भाकित भारतीय टीमचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने केलं आहे.

कैफने अशी प्रतिक्रिया का दिली, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियासाठी फिल्डिंग डोकेदुखी ठरली आहे. खराब फिल्डिंगमुळेच टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 सामन्यात 12 धावांनी पराभव झाला. टीम इंडियाच्या या फिल्डिंगमुळे कैफने ही भविष्यवाणी केली आहे. “एकाच सामन्यात इतक्या कॅचेस, मिस फिल्डिंग होणं अपेक्षित नाही. हे जरा अति होतंय.

पुढील वर्षी भारतात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्यात येणार आहे. जर टीम इंडियाला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकायची असेल, तर फिल्डिंगमध्ये सुधारणा करावी लागेल. असं कैफने म्हटलं आहे. आम्ही आमच्या वेळेस चांगली फिल्डिंग करता यावी, यासाठी अधिक वेळ सराव करायचो, असंही कैफने म्हटलं. कैफ सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर एका कार्यक्रमादरम्यान बोलत होता.