वीजबिल माफीसाठी 21 डिसेंबरला वाहनांसह कोल्हापूर शहरातून मोर्चा काढण्याचा निर्णय झाला आहे. लॉकडाऊन काळातील सहा महिन्याचे वीजबिल सरसकट माफ करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या कार्यालयात काल बैठक झाली.
असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जिल्हा व शहर कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा पार्टे, भाऊ घोगळे, हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, विक्रम पाटील, विजय पवार, लोकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय कडवेकर, उपाध्यक्ष प्रकाश भोसले संघटना अध्यक्ष विजय पाटील, विजय तेरदाळकर, गौस मुल्ला, बस वाहतूकदार संघटनेचे सतीशचंद्र कांबळे, प्रदीप राठोड, संजय सावंत, सुभाष आढावकर, विशाल भांडवलकर, रिक्षा संघटनेचे बाबा इंदुलकर आदी उपस्थित होते.
वीजबिल माफीसाठी 21 डिसेंबरला वाहनांसह शहरातून मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी झाला. मोर्चामध्ये सर्व वाहनांची संख्या पाच हजारापर्यंत असावी, असे नियोजन करण्याचे ठरले. सर्व एमआयडीसी व जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद करून मोर्चामध्ये वाहने सामील करून घेण्याचा निर्णयही यावेळी झाला.