अयोध्येतील रामजन्मभूमी निर्मितीसाठी रामजन्मभूमी ट्रस्ट व विश्वू हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण देशभरात निधी संकलन अभियान राबवण्यात आले होते. सुरुवातील महिनाभर चालणारे हे अभियान काही दिवस आणखी चालवण्यात आले. आता निधी संकलन अभियान थांबवण्यात आले आहे. या पार्श्वभूमिवरच राममंदिरनिर्मीतीसाठी गोळा होत असलेल्या निधीचे आकडे समोर येत आहे. विशेष म्हणजे ज्या राज्यांत कॉग्रेसचे सरकार आहे, त्या राज्यांमधून सर्वाधिक निधी गोळा झाला आहे. राममंदिर निधी संकलन अभियानावर सातत्याने टीका करणार्या कॉंग्रेसशासीत राज्यांतच सर्वाधिक निधी प्राप्त झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
निधी संकलनातून गोळा झालेल्या निधीमध्ये अव्वल क्रमांक राजस्थानचा आहे. त्यामागोमाग दुसरा क्रमांक पंजाबने लावला आहे. राजस्थानमधून राममंदिरासाठी एकुण ५१५ कोटी निधी प्राप्त झाला आहे, तर पंजाबमधून आतापर्यंत ४१ कोटी रुपयांची देणगी आली आहे. यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. अशी माहिती रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे.
भारतातील प्रत्येक नागरिकाचा या भव्य मंदिराच्या निर्मीतीत सहभाग असावा या हेतून घरोघरी जाऊन निधी गोळा करण्याचे हे अभियान सुरु करण्यात आले होते. संपूर्ण देशातून अतिशय ऊस्फुर्त प्रतिसाद या अभियानास मिळाला आहे. तामिळनाडूतून ८५ कोटी, केरळमधून १३ कोटी, मणिपुरमधून २ कोटी, अरुणाचल प्रदेशमधून साडेचार कोटी, ई. निधी आतापर्यंत प्राप्त झाला आहे. अजूनही काही भागांतून खांत्यामध्ये पैसे जमा करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या आकड्यांत ऊल्लेखनीय वाढ होण्याची शक्यता चंपत राय यांनी व्यक्त केली आहे.
या अभियानासाठी विश्व हिंदू परिषद आणि रा.स्व.संघाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांनी समर्पन भावाचे महत्व पटवून देत निधी गोळा केला आहे. येणार्या तीन वर्षांमध्ये भव्य राममंदिराची निर्मीतीप्रक्रिया पूर्ण होईल असेसुद्धा यावेळी सांगण्यात आले.पाच एकरच्या परिसरात मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात भक्तनिवास, पुस्तकालये, संशोधन केंद्रे अशा विविध बाबींची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा यावेळी देण्यात आली.