राज्यसभेतील काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यांच्या सन्मानार्थ अनेक खासदारांनी नबी आझाद यांच्या समारोपाचे भाषण केले. यानंतर आझाद खूप भावूक झाले होते. मी त्या सुदैवी लोकांपैकी आहे जे कधीही पाकिस्तानात गेले नाहीत. परंतु जेव्हा मी पाकिस्तानातील परिस्थितीबाबत वाचतो-बघतो तेव्हा मला गर्व होतो, अभिमान वाटतो की आम्ही हिंदुस्थानी मुसलमान आहोत. जगात जर कोणत्या मुस्लिमांचा गौरव करायचा असेल तर तो हिंदुस्थानी मुस्लिमांचा केला पाहिजे, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी आज आपल्या निरोपाच्या भाषणात सांगितले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद काल राज्यसभेतून निवृत्त झाले. यानिमित्त पंतप्रधानांसह मान्यवर नेत्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे भाषण लक्षणीय ठरले. ते म्हणाले की, “गुलाम नबी आझाद म्हणजे काश्मीरचा बिन काट्यांचा गुलाब आहे. ज्यांच्यासोबत काम केले. ती व्यक्ती आज सभागृहातून जात आहे.
मला विश्वास आहे की, ते पुन्हा सभागृहात परत येतील. त्यांनी इंदिरा गांधीपासून ते मोदीजींपर्यंतचा काळ बघितला. त्यांनी इंदिरा गांधी ते मोदी असं पुस्तक लिहायला हवं. जेव्हा दिल्लीच्या राजकारणात मोठंमोठी माणसं होती. तेव्हा आझादांसारखी एक व्यक्ती गावातून येते आणि यशस्वी झाले,” असं राऊत म्हणाले.
दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेवर परत यावे, अशी मागणी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवलेंनी केला. जर काँग्रेसने तुम्हाला पुन्हा राज्यसभेवर पााठवले नाही, तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर आणू, असे आठवले म्हणाले.