राष्ट्रपतींकडून खासदार श्रीनिवास पाटलांना मिळाले ‘हे’ गिफ्ट

293

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना भारतीय राजमुद्रेने सुशोभित राजदंडक भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी पत्राद्वारे या शुभेच्छा देताना राज्यपाल म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवोद्गार काढून त्यांना उत्तम आरोग्य व दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

याबाबत खासदार श्रीनिवास पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. मला राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त पाठवलेले शुभेच्छा पत्र व भारतीय राजमुद्रेने सुशोभित राजदंडक भेट देण्यात आले. सिक्कीम राज्याच्या राज्यपाल पदाच्या कार्याची आठवण ठेऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांनी केलेल्या या सन्मानाने मी भारावून गेलो आहे असे ते म्हंटले आहेत.

राष्ट्रपतींनी या पत्रामध्ये या खासदर पाटील यांना उत्तम आरोग्यासाठी व दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकिय ध्वजवंदन कार्यक्रमात प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते खासदार श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रपतींचे पत्र व राजदंडक प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाटील यांना पाठवलेल्या शुभेच्छा पत्रात म्हटले की, राज्यपाल म्हणून तुम्ही सिक्कीम राज्याचे सर्वोच्च घटनात्मक पद भूषविले याची आठवण करून देताना मला आनंद होत आहे. आपण राज्यपालांची कर्तव्ये पदाच्या सन्मानानुसार पार पाडली. माझ्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात आपले अमूल्य योगदान यशस्वीरित्या देऊन आपण आपल्या पदापासून मुक्त झालात. ही माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब आहे. व्यक्तिमत्त्व, कृतज्ञता आणि विपुल अनुभवांनी समृद्ध असलेले तुम्ही नेहमीच समाज आणि देशासाठी प्रेरणेचे स्त्रोत राहाल.