खासदार विनायक राऊत यांच्यामुळे नाणार प्रकल्प रखडला

17

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाणार प्रकल्पाचे काम सुरू होईल असा विश्वास भाजपचे नेते आणि नाणार प्रकल्पाचे सर्मथक प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंही या प्रकल्पासाठी सकारात्मक आहेत. मात्र खासदार विनायक राऊत यांच्यामुळे हा प्रकल्प रखडला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

महाविकास आघाडीचे प्रणेते खासदार शरद पवार यांनी एपीएमसी कायद्याचे समर्थन केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनी ते आत्मचरित्र वाचावे नंतर कृषी कायद्याला विरोध करावा. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आरपीआय आमच्याबरोबर आला तर या पक्षाबरोबर युती होईल अन्यथा भाजप या पुढील सर्वच निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जठार यांनी सांगितले.

नाणार प्रकल्पाबाबत भाजपची जी भूमिका असेल तीच माझी आहे.असेही खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे. अभ्यास नसलेल्या नेत्याला आम्ही केंद्रात पाठवले हीच आमची चूक झाली. प्रकल्प उभारताना नागरिकांचे जीवन आणि येथील पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही. याची काळजी घेण्याची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली होती. सरकारने त्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत.तरीही राणेंचा प्रकल्पाला विरोध आहे. २०२४ च्या निवडणुकीनंतर ते दिल्लीत दिसणार नाही याची काळजी भाजप घेणार आहे असेही जठार यांनी सांगितले आहे.