भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मराठा समाजाच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. काल संध्याकाळी कोरोनाची परिस्थिती व मराठा समाजाचा विरोध बघून राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. यावर पुण्यामध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही?
“एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेलं हे शहाणपण आहे. असं म्हणत त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. सरकारमध्ये कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ‘मातोश्री’मध्येच बसलेले असतात” अशी टीका करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला केला .