वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी MPSC परीक्षेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “MPSC ची परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित 85 टक्के जनतेचं काय?” असा सवाल त्यांनी महाराष्ट्र सरकारला विचारलाय. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मागणी मराठा समाजातील अनेक संघटनांकडून केली गेली होती. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकलत असल्याचं जाहीर केलं होतं. यावर प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे.
मला जे बोलायचे ते मी बोलतो. एका जातीचं राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्नांवर बोलायचे हे आम्ही ठरवितो. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपलं चारित्र्य बघावं आणि नंतर टीका करावी,” असा टोलाही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे.