मागच्या वर्षभरापासून कोरोनाच्या कारणामुळे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने अनेक वेळेस पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. सुरुवातील एकदोन वेळेस विद्यार्थ्यांना हे सायुक्तीत वाटलं असेल आता मात्र १४ मार्च ला होणारी परीक्षाहि पुढे ढकलली जाणार हे आयोगाने जाहीर करताच. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला व मुले पुणे, औरंगाबाद व इतर जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा नियोजित वेळेत व्हावी म्हणून रस्त्यावर उतरले आहेत.
मुलांचा उद्रेक शमवण्यासाठी पोलिसांना काही ठिकाणी बळाचा उपयोग करण्यात आल्याचे वृत्त आहेत. एमपीएससी परीक्षार्थ्यांच्या बाजूने आता भाजप उतरली आहे व महाविकास आघाडी सरकारमधील सहभागी पक्ष कॉंग्रेच्या काही नेत्यांनीही परीक्षा नियोजित तारखेलाच झाली पाहिजे असे म्हंटले आहे. एमपीएससी परीक्षा देण्यासाठी प्रवर्गानुसार वयाची अट आहे काही विद्यार्थ्यांचे तर हे वर्ष शेवटचे वर्ष आहे म्हणून अशा असंख्य विद्यार्थ्यांवर अन्याय होणार हे मात्र निश्चित आहे. मुलांनी अनेक वर्षापासून घर-दर सोडून अधिकारी व्हायचे स्वप्न बघून पुणे औरंगाबाद सारख्या ठिकाणी जावून अभ्यास करत आहेत जर परीक्षाच नाही झाली, त्यांचे परीक्षा द्यायचे वय संपल्यावर विद्यार्थ्यांनी काय करावे असे अनेक प्रश्न विद्यार्थी व भाजप नेते आयोगाला अर्थात सरकारला विचारत आहेत.
कॉंग्रेस चे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलणे चुकीचे आहे म्हंटले आहे तर युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष सत्यजित तांबेंनी या निर्णयाचा विरोध केला आहे.
सोसीअल मिडीयावर भाजप, मनसे नेत्यांनी व विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकललेल्या निर्णावरून व्यक्त झाले आहेत आयोग व सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत