एमपीएससी : ‘काही उतावीळ हौसी अंदोलनजीवीनी अता तरी रस्त्यावर झोपू नये’

16

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. काही विद्यार्थ्यांनी याला विरोध केला आहे. तर काही विद्यार्थ्यांनी समर्थन केलं आहे.

सोबतच अनेक नेत्यांनी सदरील पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे.विशेष म्हणजे एमपीएससीच्या उमेदवारांच्या मागणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठींबा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील एमपीएससी मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला आहे.

“MPSC परिक्षा पुढे ढकला म्हणुन सर्व विद्यार्थ्यांनी आग्रह धरलाय. मागील काळात काही हौसी आंदोलनजीवी रस्त्यावर झोपले होते, त्यानंतर MPSC ची तयारी करणाऱ्या 2 गरीब विद्यार्थ्यांना कोरोना मुळे जीव गमवावा लागला. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या उतावीळ नेत्यांनी आता तरी आडवे येऊ नये.” असा टोला त्यांनी एमपीएससीची परीक्षा घेण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे.