मुख्यमंत्री महोदय आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे फक्त तुमच्या भाषणात नाही तर कृतीतही दिसू द्या:चित्रा वाघ

14

महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचं सत्र हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अवघ्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहेमहाराष्ट्राला सुन्न करणारी घटना पेणमध्ये घडली आहे. 

मुख्यमंत्री महोदय आपला महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे फक्त तुमच्या भाषणात नाही तर कृतीतही दिसू द्या, असं आवाहन करत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आमच्या मागणीची विचार न झाल्यामुळे संबंधित आरोपीने जेलबाहेर आल्यानंतर पुन्हा असं दुष्कृत्य केलं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नसल्याचं म्हणत वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली.