म्युकरमायकोसीस खाजगी रुग्णालयातील ऊपचाराकरिता दरनिश्चित! तुमच्या शहराचे दर काय? जाणुन घ्या

6

कोरोनाच्या रुग्णांप्रमाणेच म्युकरमायकोसीसचे रुग्णसुद्धा मोठ्यासंख्येने वाढत आहे. तसेच म्युकरमायकोसीसवरील ऊपचारसुद्धा प्रचंड खर्चीक असून नागरिक ऊपचारासाठी खाजगी रुग्णालयांना प्राधान्य देत आहे. अशावेळी खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची लुट होऊ नये व अगोदरच कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्यांना आर्थिक दिलासा मिळावा या हेतून म्युकरमाकोसीसवरील खाजगी रुग्णालयातील ऊपचाराकरिता दर निश्चित करण्यात आले आहे.

यामध्ये “अ” , “ब” आणि “क” अशा शहरांची वर्गवारी करण्यात आली आहे.

कसे आहेत दर?

  • वॉर्डमधील अलगीकरण : “अ” वर्ग शहरांसाठी ४००० हजार रुपये, “ब” वर्ग शहरांसाठी ३००० हजार रुपये आणि “क” वर्ग शहरांसाठी २४०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
  • व्हेंटिलेटरशिवाय आयसीयु व विलगीकरण : “अ” वर्ग शहरांसाठी ७५०० रुपये, “ब” वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये, “क” वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये दरनिश्चित करण्यात आले आहे.
  • व्हेंटिलेटरसह आयसीयू व विलगीकरण : ” अ” वर्ग शहरांसाठी ९००० रुपये, “ब” वर्ग शहरांसाठीव ६७०० रुपये, “क” वर्ग शहरांसाठीव ५४०० रुपये अशाप्रकारे दरनिश्चित करण्यात आले आहे.

तुमचे शहर कुठल्या वर्गात येते?

  • “अ” वर्ग : मुंबई व मुंबई महानगर क्षेत्र, पुणे व पुणे महानगर क्षेत्र, नागपुर
  • “ब” वर्ग : नाशिक, अमरावती, अौरंगाबाद, भिवंडी, सोलापुर, कोल्हापुर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली यांसह सर्व जिल्हा मुख्यालये यांचा समावेश
  • “क” वर्ग गटात “अ” व “ब” गटांव्यतिरिक्त असणार्‍या सर्व शहरांचा समावेश करण्यात आला आहे.