राज्यपालांविषयी बोलताना मुंबई काँग्रेस अध्यक्षांची जीभ घसरली

12

महाराष्ट्रातील काही शेतकरी संघटनांनी विशेषतः किसन किसान सभा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस इत्यादी पक्ष संघटनांनी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या बॅनर खाली केंद्र सरकारच्या विरोधात मुंबई च्या आझाद मैदानात आंदोलन उभारले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे या शेतकरी आंदोलनाला समर्थन असल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात व दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांनी आझाद मैदानात उपस्थिती लावून आंदोलनाला समर्थन दर्शविले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आंदोलनात एकही शिवसेना नेता दिसला नाही.

आंदोलनाचे निवेदन घेऊन राजभवनाकडे जाताना किसान सभेचे अजित नवले, कॉंग्रेस चे प्रवक्ते सचिन सावंत व इतर काही नेते आंदोलनाचे शिष्टमंडळ म्हणून राज्यपालांना भेटून निवेदन देण्यासाठी गेले असता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना रोखलं.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजभवनात नाही असे समजल्यावर मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार भाई जगताप यांची राज्यपालांवर टीका करताना जीभ घसरली ‘राज्यपाल डरपोक आहेत राज्यपाल पळपुटेआहेत, राज्यपालांना कंगना राणावत ला भेटायला वेळ आहे पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही’ असे भाई जगताप बोलले.