दिल्लीचा पराभव करत मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत दाखल

0

काल झालेल्या सामन्यात आपली ताकद दाखवत मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. सांघिक खेळीच्या जोरावर मुंबईने दिल्लीवर 57 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच मुंबईने सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तसेच दिल्लीकडे अजून एक संधी असून हैदराबाद, बेंगळूर यांच्यातील सामन्यातून पराभूत संघासोबत त्यांना खेळता येणार आहे.

मुंबईने 5 बाद 200 धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तर देताना दिल्लीने 20 षटकात 8 बाद 143 पर्यंत मजल मारली. जसप्रीत बुमाराह ने 14 धावांमध्ये 4 विकेट घेत मुंबईच्या विजयावर शिककामोर्तब केले. स्टो ई नीस 65 आणि अक्षर पटेल 42 यांनी दिल्लीच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या मात्र, ते दिल्लीला विजय मिळवून देऊ शकले नाही.

त्याआधी कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. त्यानंतर ईशान किशन 55, सूर्यकुमार यादव 51, आणि हार्दिक पंड्या 37, यांनी तडाखेबंद फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली.