मुंबई इंडियन्स स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईटने खेळाडूंना मायदेशी पाठवणार, अन्य संघानाही करणार मदत

5

यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित केली आहे. त्यामुळे अनेक संघात असलेले परदेशी खेळाडूंची घरवापसीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमानसेवा ऑस्ट्रेलियाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंपुढे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मात्र, मुंबई इंडियन्सनं संघातील परदेशी खेळाडूंना स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईट्सने पाठवणार असल्याचं सांगितलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना मायदेशात येण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मुंबई इंडियन्सने अन्य फ्रँचायझींनाही मदत करण्यासाठी हात पुढे केला आहेत.

चार्टर्ड फ्लाईट्स न्यूझीलंड, वेस्ट इंडिज व्हाया दक्षिण आफ्रिका या मार्गे जाणार आहेत. त्यांनी अन्य फ्रँचायझींनाही त्यांच्या परदेशी खेळाडूंना सोबत पाठवण्यास सांगितले आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघात असलेले ट्रेंट बोल्ट, ॲडम मिलने, जेम्स निशॅम, शेन बाँड ही न्यूझीलंडच्या खेळाडू आहेत. एक चार्टर्ड फ्लाईट किरॉन पोलार्डला घेऊन त्रिनिदादकडे रवाना होणार आहे. त्याच विमानातून आफ्रिकन खेळाडू क्विंटन डी कॉक व मार्को जॅन्सेन हेही आपल्या मायदेशी रवाना होतील.