नुकताच मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करमण्याय आला. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प २९४५.७८ कोटी रुपयांचा असणार आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात १ कोटी २९ लाखांची वाढ करण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व शाळांचे नामांतर करुन ‘मुंबई पब्लिक स्कूल’ करण्यात आले आहे. हे या अर्थसंकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जात आहे. पालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनाता सकारात्मक दृष्टीकोण निर्माण व्हावी या ऊद्देशाने हे नामांतर केले असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा शिक्षणविभागातील योजनांसाठी अधिक तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या बजेटमध्ये भांडवली खर्चासाठी २४४ कोटींची तरतूद करण्यात आली. ज्यामध्ये डिजिटल क्लासरूम, व्हच्र्युअल क्लासरूम, अक्षरशिल्प, स्वसंरक्षण प्रशिक्षण, अपंग विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती, उपस्थिती भत्ता अशा जुन्याच योजनांबरोबरच काही नवीन योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाने चालू आर्थिक (२०२०-२१) वर्षांत २९४४.५९ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. गेल्या आर्थिक वर्षांतील (२०१९-२०) अर्थसंकल्पापेक्षा त्यात २१०.८२ कोटींनी वाढ के ली होती. मात्र येत्या आर्थिक वर्षांतील अर्थसंकल्पात केवळ १ कोटी २९ लाखांचीच वाढ करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पात काही नविन बाबींनादेखील प्राधान्य देण्यात आले आहे. याअंतर्गत सीबीएसई बोर्डाच्या दहा नवीन शाळांसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु कतण्यात येणार आहे. याकरिता दोन कोटींची तरतूद केली गेली आहे. दहावीत उत्तीर्ण होऊन प्रथम येणाऱ्या २५ विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक शिक्षणासाठी प्रतिवर्षी प्रतिविद्यार्थी २५ हजार रुपये अथवा संबंधित शिक्षण संस्थेने ठरवून दिलेले पूर्ण शैक्षणिक शुल्क देण्यात येणार आहे. त्याकरिता ३५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. विविध सामाजिक संस्थान आणि पालिकेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना कारीअर मार्गदर्शनाचे धडेसुद्धा दिले जाणार आहे