रायगड पोलिसांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केले आहे .असे ही कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले 5 मे 2018 रोजी अन्वर नाईक यांनी आपल्या राहत्या घरात आईसोबत आत्महत्या केली होती .
त्यांनी सुसाईड नोटमध्ये अर्णव गोस्वामी फिरोज शेख , नितेश राणा यांच्यावर आरोप केले होते आणि यांच्या वर आरोप लावले होते की ,यांनी माझ्या कामाचे पैसे न दिल्यामुळे मी आत्महत्या करत आहे. त्यांच्या पत्नीने अक्षदा नाईक अलिबाग पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार सुद्धा दाखल केली होती ,परंतु पुरेशा प्रमाणात पुरावे नसल्याच्या कारणावरून त्यांनी ही केस बंद केली .
परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आले .त्यानंतर माझी आणि आजी सरकारांमध्ये युद्ध निर्माण झाले, त्यातून अशी कारवाई झाली अशी शक्यता वर्तवली जात आहे. ५ मे २०२०रोजी अन्वय नाईक यांच्या पत्नीने अक्षदा नाईक यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ बनवला त्यात त्यांनी आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलीस योग्य प्रमाणात तपास केले नसल्याचा आरोप केला .