“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणावी लागेल” त्या मुद्द्यावरुन मुनगंटीवार अाक्रमक, सभागृहात खडाजंगी

30

नुकतेच संपूर्ण महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी एक घटना जळगाव येथे घडली आहे. जळगाव येथील आशादीप शासकीय वसतिगृहातील तरुणी तरुणींंना कपडे काढून नाचायला लावले आहे. गंभीर म्हणजे यामध्ये पोलिसांचाच समावेश असून घटनेचा व्हिडिअोसुद्धा व्हायरल होतो आहे. यावरुनव माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आज सभागृहात चांगलेच आक्रमक झालेत. महाराष्ट्रात ऐवढ्या गंभीर घटना घडूनसुद्धा सरकार केवळ त्याची नोंद घेण्याची भाषा करते आहे. मग राज्यात सत्ता असून काय ऊपयोग. राज्यातील महिलांच्या असुरक्षिततेचे प्रमाण असेच वाढत राहिले तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला हेलावुन सोडणारी ही घटना आहे. यामध्ये काही पोलिस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील काही पुरुषांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. मात्र सुधिर मुनगंटीवार या मुद्द्यावरुन सरकारवर चांगलेच संतापले.

“सभागृहात सदस्यांनी अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. हा इतका गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय. अशा पद्धतीने तुमच्या, माझ्या आई बहिणीला नग्न करुन, कपडे काढून नाचायला लावलं जातंय आणि आम्ही नोंद घेवू म्हणतात. इथं मृत मनाचे आमदार आहेत? आमचं मन जिवंत आहे. तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. उत्तरात सांगितलं पाहिजे की, एक तासात चौकशी करतो. काय कारवाई करणार आहे याचा अहवाल घेतो…पण म्हणतात नोंद घेतो…हे पाप फेडावं लागेल. आमच्या आई-बहिणीला नग्न केलं जातं या महाराष्ट्रात आणि आम्ही नोंद घेतो,” असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसांत चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांनी मुनगंटीवार यांच्या विधानांवर आक्षेप घेत मुनगंटीवार धमक्या देत आहे असे म्हटले. तर दवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांची बाजू ऊचलून धरत पुन्हा सरकारवर टीकास्त्र सोडले.