उत्तर प्रदेशातील मथुरेतील नांदगाव परिसरात नंदबाबा मंदिरात नमाज पढणाऱ्या दोघांविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंदिरात दोघे नमाज पढत असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर नांदगाव मधील तिघांनी त्यावर पोलिसांत तक्रार दाखल केली. २९ ऑक्टोबर रोजी हा सर्व प्रकार घडला.
दिल्लीतील खुदाई खिदमतगार संघटनेचे चार सदस्य २९ ऑक्टोबरला मंदिरात आले होते. त्यामधील फैजल खान आणि चांद मोहम्मद यांनी मंदिराची पूर्वपरवानगी न घेता मंदिरात नमाज पढली. बाकीच्या दोघांनी फोटो काढून सोशल साईट्स वर टाकल्यानंतर मंदिर परिसरातील मुकेश गोस्वामी, शिवहरी गोस्वामी व कान्हा यांनी याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केली. फैजल खान आणि चांद मोहम्मद यांच्याबरोबरच अन्य दोघांवर १५३-A, २९५, ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.