दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ ( जेएनयूची ) माजी विद्यार्थी नेता शेहला रशीद पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. शेहला यांच्यावर त्यांच्या वडिलांनी खळबळजनक आरोप केले आहेत. शेहला रशीद कायमच चर्चेत असतात. मात्र, वडिलांनीच केलेल्या आरोपांमुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
शेहला रशीद यांचे वडील अब्दुल रशिद शोरा यांनी आपली मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असून, आपल्याला तिच्यापासून धोका असल्याचं म्हटलंय. तसं पत्र अब्दुल राशिद शोरा यांनी जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना पाठवलंय. सोबतच शोरा यांनी आपली पत्नी जुबैदा शौर, मोठी मुलगी आसमा रशीद आणि एक पोलिस कर्मचारीही शेहला रशीद सोबत देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे.
तसेच जम्मू काश्मीर पीपल्स मुव्हमेंट पक्षामध्ये सहभागी होण्यापूर्वी शेहलाने एका उद्योजकांकडून तीन कोटी रुपये घेतल्याचा दावाही शोरा यांनी पत्रात केला आहे. आपल्या जीवाला धोका असून आपल्याला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणीही शेहला रशीद ह्यांच्या वडिलांनी केलीय.