नवारस्ता (ता. पाटण) येथे पाटण तालुका सकल मराठा समाजाच्या पाटण तालुक्याच्या वतीने नवारस्ता येथे नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा झाला. माझ्या वडिलांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही असे त्यावेळी बोलताना पाटील म्हणाले.
सरकारने मी मराठा आरक्षणाची चळवळ पुढे घेऊन जात असल्याचे समजल्यावर माझ्यावर दबाव टाकला. तो दबाव मी झिडकारत या पदाला लाथ मारत राजीनामा दिला. ही चळवळ यापुढेही मोठ्या जोमाने पुढे घेऊन जाणार आहे.असेही ते बोलते वेळी म्हणाले .
पाटील म्हणाले, “”न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला भाग पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.मराठा आरक्षणासाठी उभारलेला लढा शेवटच्या श्वासापर्यंत पुढे घेऊन जाणार आहे.
यावेळी ढेबेवाडीचे भरत पाटील, पवन तिकुडवे, रमेश सूर्यवंशी, रवी पाटील उपस्थित होते.तसेच यावेळी भरत पाटील, नितीन सत्रे, अनिल संकपाळ, सचिन देसाई, भूषण जगताप, पवन तिकुडवे यांनी मनोगत व्यक्त केले.
इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. सरकारच्या विरोधात आंदोलनाचा लढा उभारण्याची वेळ आली आहे. त्यासाठी मराठ्यांनो जागे व्हा, जागे व्हा, असे आवाहन माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केले.