अभिनेता सुशांत सिंह रजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने आता आपल्या आयुष्याला नव्याने सुरू केली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीतून रिया चक्रवर्ती बाहेर पडली आहे का? या प्रश्नामुळे ती आता पुन्हा चर्चेत आली आहे.
रिया चक्रवर्तीचे काही फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. हे फोटो रोडिज फेम राजीव लक्ष्मण यांच्यासोबत काढले आहेत. सोशल मिडियावर तर या फोटोंनी धुमाकुळ घातला आहे.
रोडिज फेम राजीव लक्ष्मणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो रिया चक्रवर्तीसोबत दिसत आहे. रियाने त्याला मिठी मारली आहे. या फोटोमध्ये दोघे खूप खुश दिसत आहेत.
शिवाय राजीवनं हा फोटो शेअर करताना रियाला ‘My Girl’ असं म्हटलं आहे.
रिया इतक्या लगेच मुव्ह ऑन करू लागल्यानं नेटिझन्सनी तिला ट्रोल केलं. त्यामुळे राजीवनं हा फोटो लगेच हटवला आहे. अखेर राजीव लक्ष्मणनं हा फोटो हटवला आहे आणि याबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे. राजीवने या पोस्ट मध्ये, “मला वाटतं मी चुकीचा शब्द वापरला आणि कोणत्याही कारणाशिवाय अडचण ओढावून घेतली आहे. रिया माझी जुनी मैत्रीण आहे आणि तिला पुन्हा भेटल्यानं मी खूप आनंदी आहे. तिचं सर्व चांगलंच व्हावं अशीच प्रार्थना मी करतो”.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी राहत्या घरी वांद्रे येथे आत्महत्या केली. या आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती यांच्यावर आरोप करण्यात आले. या आरोपावरून त्यांची कसून चौकशी करण्यात आली होती. सीबीआयकडून प्रकरणाचा तपास होत असताना यात ड्रग्ज अँगल समोर आला आणि रिया या सगळ्यात अधिक अडकत गेली. यात रियाला १ महिन्याचा तुरूंगवास भोगावा लागला होता.