लोकप्रिय गायक सोनू निगमने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सोनू निगमचा अल्बम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या आगामी अल्बममधील ‘ईश्वर का वो सच्चा बंदा’ या हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याच्या प्रदर्शन सोहळ्यात सोनूने एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सोनू निगम म्हणाला, “माझ्या मुलाला मी गायक करणार नाही. किमान भारतात तरी त्याने काम करु नये अशी माझी इच्छा आहे.”
या गाण्यासाठी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सोनू निगमने हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तुझ्या मुलाला गायक व्हायचं आहे का ? या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला की, “नाही, खरं सांगायचं तर त्याने व्यवसायिक गायक होऊ नये अशी माझी इच्छा आहे. अन् व्हायचंच असेल तर त्याने भारतात काम करु नये असं वाटतं. तो भारतात राहात नाही तो सध्या दुबईमध्ये आहे. त्याने तिथंच करिअर करावं असं वाटतं. त्याला गाण्याची आवड आहे. तो देखील खूप छान गातो. पण त्याला गाण्यापेक्षा अधिक गेमिंग करायला आवडतं. मला वाटतं त्याने आपलं करिअर निवडलं आहे.”