कोरोना संसर्गजन्य असला तरी म्युकरमायकोसीस हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची काही कारण नाही. पण लक्षणे आढळताच वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे आज म्हणाले.
नियोजन सभागृहात म्युकरमायकोसीसबाबत आढावा घेताना ते बोलत होते.म्युकरमायकोसीसकरीता वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून खाजगी रुग्णालयातसुध्दा या आजाराचे रुग्ण आढळत आहेत.
यावेळी या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. हरी पवार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. जोशी आदी उपस्थित होते.