एन. व्ही. रमण असणार भारताचे नवे सरन्यायाधीश

6

सध्या सरन्यायाधीशपदी कार्यरत असणारे शरद बोबडे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. एप्रील महिन्याच्या अखेर शरद बोबडे यांचा कार्यकाळ संपणार असल्यामुळे त्यांचे ऊत्तराधिकारी म्हणून एन.व्ही.रमण यापुढे देशाच्या सरन्यायाधीशपदाची धुरा सांभाळणार आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनीच त्याचे नाव सुचवले असून राष्ट्रपतींनी यांस मंजुरी दिली आहे.

एन.व्ही.रमण सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ न्यायमुर्ती आहेत. रमण मुळचे आंध्र प्रदेशातील कृष्णा पोन्नावरम गावाचे आहेत. ६४ वर्षांच्या रमण यांनी १० फेबृवारी १९८३ ला वकीलीला सुरुवात केली होती. रमण यांचा कायदे विषयातील अभ्यास गाढा असून त्यांचा अनुभवसुद्धा प्रचंड आहे.

एन.व्ही.रमण हे भारताचे ४८ वे सरन्यायाधीश असणार आहेत. नवे सरन्यायाधीश रमण २४ एप्रीलला शपथ घेणार आहेत. तसेच २६ अॉगस्ट २०२२ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. सोळा महिने एन.व्ही. रमण यांचेकडे सरन्यायाधीश पदाची जवाबदारी असणार आहे.

मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ २३ एप्रील पर्यंत असणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नविन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया मार्चमध्ये सुरु करण्यात आली. केंद्रिय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी यासंबंद्धी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहीले होते.