पिंपरी शहरातील नद्यांना गटाराचे रुप प्राप्त झाले आहे. शहरातील नद्यांचे वाढते प्रदुषन रोखण्यासंदर्भात महापालिकेतील सत्ताधार्यांकडून काहीही ऊपाययोजना करण्यात अालेल्या नाही. प्रसंगी या नद्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव द्या, जेणेकरुन भाजप मोदींचे नाव दिल्यानंतर तरि लवकरांत लवकर त्या स्वच्छ करण्याचा प्रयत्न करेल. अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाने केली आहे.
नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केली जातात. मात्र तरिही नद्यांचे प्रदुषन वाढते आहे. गेल्या चार वर्षात सत्ता भोगणार्या भाजपने याकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या नद्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव द्या, जेणेकरुन नाव दिल्यानंतर त्या लगेच साफ केल्या जातील असे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहरअध्यक्ष माधव पाटील यांनी यावेळी म्हटले.
महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देत ही मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी पर्यावरण अहवालावरही चर्चा करण्यात आली. कालबाह्य झालेली माहिती पुन्हा पुन्हा समोर ठेवली जात आहे. ऊपाययोजना काय केल्या याबद्दल कुणी बोलण्यास तयार नाही. या अहवालातून काडीचाही बोध होत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी पदवीधरकसंघाकडून यावेळी व्यक्त करण्यात आली.