साताऱ्यात मुख्य बसस्थानकात मनसेच्या कार्यकर्त्यांनी सातारा एसटी डेपोतून औरंगाबादकडे जाणाऱ्या प्रत्येक एसटी बसवर छत्रपती संभाजीनगर हा फलक लावूनच रवाना करावी, अन्यथा मनसेचे कार्यकर्ते तो फलक लावून एसटी बसेस रवाना करेल, असा आक्रमक पवित्रा मनसेचे कार्यकर्ते राहुल पवार यांनी घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सातारा बसस्थानकावर मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सातारा-औरंगाबाद बसला संभाजीनगर फलक लावण्यात यावा, यासाठी आंदोलन केले.
आंदोलनात महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सोनाली शिंदे, राजेंद्र (आप्पा) बावळेकर, सागर बर्गे, अविनाश दुर्गावळे, संजय गायकवाड, समीर गोळे, शिवाजी कासुरडे, निखिल कुलकर्णी, प्रतिक माने, विनय गुजर, रोहित शिंगरे, श्याम बावळेकर, दिनेश धनावडे, राणीताई शिंगरे, सोनाली कांबळे, शुभम विधाते, अमर महामुलकर, सुयोग जाधव, सुजीत पवार, संजय शिर्के, संजय सोनावणे,मयुर नळ, भरत रावळ, वैभव वेळापुरे, दिलीप सोडमिसे, अझहर शेख, गणेश पवार, चैतन्य जोशी आदी सहभागी झाले होते.
गेली अनेक वर्षे मनपामध्ये सेनेची सत्ता असून आज मुख्यमंत्री सेनेचा असून नामांतराचे विधेयक पारित केलेले असून देखील या नामांतरणाला वेळ लागत आहे. यासाठी आज मनसेने ‘आरपार’ची लढाई रस्त्यावर उतरून लढायला सुरुवात केली आहे. मनसेच छत्रपती संभाजीनगर असे नामांतरण करणार आहे.असे राजेंद्र केंजळे बोलताना म्हणाले.
मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, विकास पवार, जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे, सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.