नाना पटोले प्रदेशाध्यक्ष तर, काँगेसच्या ‘या’ नेत्याची विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती ?

1095

विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यास. त्यामुळे पुढचा अध्यक्ष कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्याने त्यांच्या जागेवर विधानसभा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधिमंडळाचे प्रतोद आमदार सुरेश वरपूडकर यांची निवड व्हावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे.

यामुळेच या पदावर काँग्रेस समितीचे विधिमंडळाचे मुख्य प्रतोद सुरेश वरपुडकर यांची ज्येष्ठतेनुसार निवड व्हावी, अशी अपेक्षा वरपुडकर यांच्या समर्थकातून व्यक्त होत आहे. काँग्रेस श्रेष्ठींनीसुद्धा या अनुषंगाने विचारविनिमय सुरू केल्याचा दावा केला जात आहे. वरपुडकर हे परभणी जिल्ह्यातील पाथरी येथून आमदार आहेत.

वरपुडकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्य मंत्रिमंडळातही प्रतिनिधित्व केलेले आहे. विधानसभेत चार वेळा ते निवडून गेलेले आहेत. एकदा खासदार म्हणूनही त्यांनी कामगिरी बजावलेली आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर कोण येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.