महाराष्ट्र कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी आज ( दि. १२ फेबृवारीस) कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा अौपचारकरित्या पदभार स्विकारला आहे. मुंबईतील टीळक भवन याठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यानंतर कॉंग्रदसच्यावतीने भव्य ट्रॅक्टर रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले आहे. टीळक भवन ते अॉगस्ट क्रांती मैदानापर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील, मावळते अध्यक्ष बाळासाहेब थोरात,
केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हान, मंत्री सुनिल केदार, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताल व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये मोठ्या बदल्यांच्या हालचाली जाणवत होत्या. आगामी विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातील पालिका निवडणुकांसाठी कॉंग्रेस पूर्ण ताकतीने ऊतरणार असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर लगेच नाना पटोले यांनी दिल्ली येथे जाऊन कॉंगेसच्या नेत्यांसोबत बैठक केली आणि त्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जवाबदारी सोपवण्यात आली. मुंबई येथे अौपचारिकरीत्या त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करत पदभार स्विकारला आहे.
नाना पटोले आक्रमक नेता म्हणून महाराष्ट्रास परिचीत अाहेत. पटोले हे विदर्भातून येतात. राजकीय कारकीर्दित शेतकर्यांसाठी त्यांचे भरीव कार्य राहिले आहे. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि ते निवडुनसुद्धा आले होते. मात्र कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच त्यांनी भाजपच्या धोरणांवर टीका करत भाजपला रामराम ठोकला आणि पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतले. यानंतर ते संपूर्ण महाराष्ट्राच्या परिचयाचे झाले होते. राज्यात महाविकाआघाडी सरकार आल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जवाबदारी त्यांच्यावर होती. पटोले यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबंतर मात्र महाराष्ट्राच्या कॉंग्रेसमध्ये चैतन्याचे वातवरण आहे.
“भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आधुनिकतेचे महत्व जाणून भारतात संगणकीत तंत्रज्ञान आणले. सुरुवातीला भाजपच्या मंडळींचा यास मात्र विरोध होता. आता याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करत भाजप चुकीची माहिती समाजात पसरवून द्वेषाचे राजकारण करत आहे. भाजपच्या या अफवांना थोपवण्यासाठी आणि गांधीजींचे विचार देशात रुजवण्यासाठी कॉंग्रेस सोशल मिडिया वॉरीयर्स कार्य करणार आहे.”असे नाना पटोले यावेळी बोलत होते.