संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. ते राजे असतील तर रयत दिसली पाहिजे, ती कुठे दिसत नाही अशा शब्दात राणेंनी टीका केली होती. त्याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत राणेंवर जोरदार प्रहार केला.
मात्र राणेंची सोशल मीडियावरून केवळ प्रसिद्धीसाठी टिवटिव सुरू आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. तसेच संभाजी राजेंची संयमाची भूमिका योग्यच आणि कौतुकास्पद आहे, असंही ते म्हणाले.
तसेच नारायण राणे स्वार्थी राजकारणी असून संभाजी राजेंसोबत त्यांची तुलना होऊ शकत नाही असं विनायक राऊत यांनी म्हंटल.