पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. याचा विरोध म्हणून रॉबर्ट वाड्रा यांनी खान मार्केट ते आपल्या ऑफीसपर्यंत सायकल चालवली. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. रॉबर्ट वाड्रा हे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती आहेत.
रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एसी कारच्या बाहेर येऊन पाहायला हवं.लोकांना किती अडचणी सहन कराव्या लागत आहेत, हे त्यांना समजून येईल. मोदी कोणत्याही गोष्टीसाठी जुन्या सरकारवर खापर फोडतात आणि पुढे जातात.
विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला असून पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या जाव्यात अशी मागणी केली जात आहे. असे असले तरी मोदी सरकारने तुर्तास कोणत्याही दिलाशाची तयारी दाखवलेली नाही.
मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवले होते. या काळात सरकारला चांगला फायदा झाला. पण, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ऑईलच्या किंमती वाढू लागल्या आहेत. दुसरीकडे सरकारकडून उत्पादन शुल्क कमी करण्याची कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.