करोनाच्या संकटाने शेतकरी पुरता पिचला गेला आहे.तीन काळे कृषी कायदे आणून मोदी सरकारने शेतक-यांना बड्या उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा विडा उचलला आहे.करोनामुळे देशभरात कोट्यवधी लोकांचा मृत्यू होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याचं सोयरसुतक नाही. नरेंद्र मोदींच्या जागी नितीन गडकरी पंतप्रधान असायला हवे होते असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत. याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत हे आता भाजपाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी भाजपाचेच काही नेते करत आहेत.असे पटोले यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणले आहे.
तसेच एका बाजूला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केल्याचा गाजावाजा करून दुस-या बाजूला खतांच्या किंमती वाढवून प्रत्यक्षात शेतक-यांची लूट करत उद्योगपती मित्रांची घरे भरण्याचे काम मोदी करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
भाजपामध्ये मोदींना हटवून गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय याचा आम्हाला आनंद आहे असंही ते म्हणाले आहेत. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.