पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे आंदोलन करत असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे जाणार होते. पोलिसांनी आपल्या समर्थकांना रोखल्याने त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. असं म्हटलं जात आहे की, त्यांच्या काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्यासाठी लखनऊला उतरल्यानंतर त्यांनी विमानतळावरच उपोषणाला सुरुवात केली. प्रल्हाद मोदी यांच्या स्वागतासाठी काही कार्यकर्ते जमले होते. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने प्रल्हाद मोदी संतापले होते. यामुळेच त्यांनी हे उपोषण आंदोलन सुरू केले होते.
ते उपोषणाला बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडून दिले. त्यानंतर प्रल्हाद मोदींनी आंदोलन मागे घेतले आणि सुलतानपूरच्या दिशेने रवाना झाले.
प्रल्हाद मोदी यांनी पुढे म्हटलं, “या प्रकारच्या गुंडागर्दीमुळे ना सरकारला फायदा होणार आहे ना पीएमओला फायदा होणार आहे. मी येथून उठणार नाही. माझा प्रयागराज येथे जाण्याचा प्लान होता आणि लगेच परतही येणार होतो. उद्यापासून कार्यक्रम सुरू होणार होते. पोलिसांनी जर आदेशाची कॉपी दाखवली नाही तर मी सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि दाखवून देईल की देशात न्याय आहे.”